Walmik Karad: ''मी निर्दोष मला सोडा..'' वाल्मिक कराडचा अर्ज; कोर्टाने सीआयडीकडे मागितला खुलासा

Ujjwal Nikam: वाल्मिक कारड म्हणाला की, ''या खटल्यातून मला मुक्त करावे, कारण माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही, खून किंवा खंडणीमध्ये मी नाही.'' असा अर्ज कराडने कोर्टात दाखल केल्याचे उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.
Walmik Karad
Santosh Deshmukh Casesakal
Updated on

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख खून प्रकरणातील आजची (गुरुवार) सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीमध्ये एक महत्त्वाची घडामोड घडली असून खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि आरोपी क्रमांक एक असलेल्या वाल्मिक कराडने स्वतःला निर्दोष म्हटलं आहे. मी निर्दोष आहे, मला सोडा, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असा अर्ज त्याने कोर्टाला सादर केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com