Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Charge Framing Deferred to December 19 After Hour-Long Arguments: संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये १९ डिसेंबर रोजी चार्ज फ्रेम होण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्याचं या प्रकरणाकडे लक्ष लागून राहिलं आहे.
Santosh Deshmukh Case

Santosh Deshmukh Case

sakal

Updated on

बीड: मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व निर्घुण हत्या प्रकरणात अभियोग पक्षाकडून विशेष मकोका न्यायालयात सादर करण्यात आलेल्या व्हाईस रेकॉर्डींगच्या पुराव्यावर अभियोग पक्ष आणि आरोपींच्या वकिलांमध्ये एक तास युक्तीवाद झाला. त्यामुळे आज अपेक्षीत असलेली दोषारोपपत्र निश्‍चिती आता शुक्रवारी (ता. १९) होणाऱ्या सुनावणीत आहे. या प्रकरणातील दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी विष्णू चाटे याच्या जामिन अर्जावर सरकारी पक्षाकडून यापूर्वीच युक्तीवाद झालेला आहे. मात्र, त्याच्या वकिलांचा युक्तीवाद बाकी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com