sarpanch santosh deshmukh
sakal
बीड - मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व निर्घृण हत्या प्रकरणात बचाव पक्षाने मागितलेली डिजिटल पुराव्यांची प्रत शनिवारी सुनावणीनंतर अभियोग पक्षाने विशेष न्यायालयाला सादर केली. तसेच, या प्रकरणातील दुसऱ्या क्रमांकाचा संशयित विष्णू चाटेला लातूरच्या कारागृहातून बीडच्या कारागृहात हलविण्याच्या मागणीवर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला.