
Beed: असं रडून भागणार नाही, सगळेच वाल्मिक कराडच नाव घ्यायला घाबरत आहेत. पण, त्यानेच जिल्ह्याचे वाटोळे केलेय. दोन समाजात तेढ निर्माण केलीय. पण घाबरायची गरज नाही असा धीर देत आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराडवर निशाणा साधला.
अपहरण करुन खुन करण्यात आलेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार मस्साजोग (ता. केज) येथे आले होते. त्यावेळी संदीप क्षीरसागर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.