

Santosh Deshmukh Case
esakal
Walmik Karad: संतोष देशमुख खून प्रकरणाला वर्ष उलटून गेलं तरी आरोपींवर अजूनही दोषारोप निश्चिती झालेली नाही. त्यातच आरोपी पक्षाकडून कोर्टाची दिशाभूल करुन वेळखाऊपणा केला जात असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. बीडच्या विशेष मकोका न्यायालयात शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्ये विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी साक्षीदार फोडले जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली.