
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: शहरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे. लड्डा यांनी चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या पावत्या पोलिसांकडे सुपूर्द केल्या असून, आता पोलीस त्यांची पडताळणी करणार आहेत. याशिवाय, दरोडेखोरांनी चोरलेले सोने नेमके कुठे ठेवले आहे, याचा तपास लागल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.