
फुलंब्री : पंचायत समिती कार्यालय अंतर्गत असणाऱ्या घरकुल योजनेत इंजिनिअर व अधिकारी पैशाची मागणी करत असल्याने तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी भिकार्याचे सोंग घेऊन पंचायत समिती कार्यालयासमोर गुरुवारी (ता.आठ) अनोखे आंदोलन करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाने जाणाऱ्या - येणाऱ्या नागरिकांनी भिकारी समजून भीक दिल्याचा प्रकार दिसून आला.