बीड - मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व निर्घृण हत्या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी फरारी घोषित केले. आरोपींबाबत माहिती कळविणाऱ्यांना बक्षीस देऊ, असे जिल्हा पोलिस दलातर्फे कळविण्यात आले आहे. नऊ डिसेंबर २०२४ रोजी घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याची नोंद केज पोलिस ठाण्यात झालेली असून तपास गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे. यातील सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे व सुधीर सांगळे हे आरोपी अद्यापही फरार आहेत.