

"भक्तीचा आधारवड कोसळला!" मातोश्री सरुबाईंच्या जाण्याने देवगड संस्थान पोरकं; वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर.
Sakal
कायगाव : नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे प्रमुख आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मार्गदर्शक ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज यांच्या मातोश्री सरुबाई ज्ञानदेव पेसोडे पाटील (वय ९९) यांचे वृद्धापकाळाने रविवारी (ता १२) सकाळी सुमारे ६.१५ वाजता देवगड येथे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे.