समाधानकारक ः 830 रेमडीसीव्हीर इंजेक्शन साठा उपलब्ध; 22 किरकोळ औषध विक्रेत्यांची नावे जाहीर

file photo
file photo
Updated on

परभणी ः कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारात महत्वाचे ठरणाऱ्या रेमडीसीव्हीर इंजेक्शनचा साठा परभणी जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील 22 किरकोळ व नऊ ठोक विक्रेत्यांकडे हे इंजेक्शन शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे उपलब्ध करण्यात आले आहे.

परभणी शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रविवार (ता. चार) रात्री पर्यंतच्या आकडेवारीवरुन जिल्ह्यात तीन हजाराच्यावर रुग्ण उपचार घेत आहेत. यातील जवळपास दोन हजार 300 रुग्ण होम आयसोलेशनध्ये उपचार घेत आहेत. तर उर्वरित सातशेच्यावर रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालेले आहेत. या रुग्णांना रेमडीसीव्हीर इंजेक्शन द्यावे लागते. त्यामुळे या रेमडीसीव्हीर इंजेक्शनचा साठा मुबलक प्रमाणात असायला हवा अशी मागणी सर्वसामान्य नागरीकामधून व्यक्त होत होती. त्यानुसार हा साठा उपलब्ध झाला आहे अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. यानुसार जिल्ह्यात नऊ ठोक औषध विक्रेत्यासह 22 किरकोळ विक्रेत्यांकडे रेमडीसीव्हीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे. त्याच बरोबर या इंजेक्शनची रक्कमही ठरवून देण्यात आली आहे.

अशी आहेत 22 किरकोळ विक्रेत्यांची नावे

परभणी शहर ः साई स्मरण मेडिकल, साईनाथ फार्मसी, यशोधन मेडिकल, करीम मेडीकल, सोफिया मेडिकल, जे.पी. मेडीकल, न्यु मानसी मेडीकल, संतकृहा मेडिकल, लोटस मेडिकल, भारत मेडिकल, ज्ञानदा मेडिकल, रसाळ मेडिकल, अबोली मेडिकल, गजानन मेडिकल, हयात मेडिकल, माणिक मेडिकल, गणेश मेडिकल, हाके मेडिकल, न्यु गणेश मेडिकल, आदित्या मेडिकल, सोनी मेडिकल, तर मानवत शहरातील नेत्रदीप फार्मसी या किरकोळ विक्रेत्यांकडे हे इंजेक्शन उपलब्ध आहे. तर वट्टमवार मेडिकल, गोदावरी फार्मा, विपुल फार्मा, गुरुकृपा एजन्सी, कमल एजन्सी, गुरु गणेश फार्मा, राजू फार्मा, कत्रुवार डिस्टीब्युटर्स, बालाजी एजन्सी या ठोक विक्रेत्याकडे
रेमडीसीव्हीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

असे आहेत रेमडीसीव्हीर इंजेक्शनचे दर

सिप्रीमो इंजेक्शन 4 हजार, जुबीआर 4 हजार 700, रेमवीन 3 हजार 960, डेसरीम 4 हजार 800, कोविलफोर 5 हजार 400, रॅमडेक 899 या दराने हे रेमडीसीव्हीर इंजेक्शन विकत घेता येते.

जिल्हा प्रशासनाकडून मुबलक प्रमाणात रेमडीसीव्हीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कुणीही ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक पैसे घेवू नयेत. विक्रेत्यांनी डॉक्टरचे सत्यप्रत चिट्ठी, रुग्णाचा कोविड पॉझीटीव्ह अहवाल, सिटी स्कॅन रिपोर्ट, आधार कार्डची झेरॉक्स प्रत घेवूनच इंजेक्शन द्यावे.
- डी. बी. मरेवाड, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, परभणी

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Medical Negligence Alleged: Woman Dies After Hernia Surgery in Umarga
Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar
Prestigious State-Level Award for Principal Dr. Chandrasen Kothawale
NEET Paper Leak Probe: CBI Conducts Secret Investigation in Ambajogai
Marathi News Esakal
www.esakal.com