‘प्रोफेशनल’ फोटोग्राफीत सावित्रीच्या लेकीची उडी !

cidko.jpg
cidko.jpg


नवीन नांदेड ः जीवन जगत असताना मुलींच्या मर्यादा काय असतात हे सर्वश्रूत आहे, परिस्थिती बदलली असली तरी अनेकवेळा पालकांकडून बाहेर जातांना अनेकवेळा लवकर घरी ये, स्वत:ची काळजी घे, असे कपडे घाल, ही जिन्स नको, तोकडे कपडे नको, मुलांसोबत फिरु नको, मोबाईलवर बोलू नको अशा कितीतरी सूचनांचा भडिमार मुलींवर केला जातो. पालक या नात्याने काळजी घेणे तो भाग वेगळा असला तरी हल्ली बाहेरच्या जगाकडून सुद्धा मुलींवर नकळत बंधन लादली जातात.

गेल्या तीन वर्षांपासून करते काम 
एवढेच नव्हे तर मुलींनी खो-खो, कुस्ती, क्रिकेट, फोटोग्राफर, ट्रॅव्हल, पत्रकार यासारख्या करिअर निवडण्यावरसुद्धा पालकांकडून आक्षेप घेतला जातो. परंतु सिडको येथील आश्विनी विठ्ठलराव डहाळे ही अपवाद ठरली आहे. प्रचंड गर्दीच्या ठिकाणी पुरुषांची मक्तेदारी असणारं फोटोग्राफीचं काम अतिशय सराईतपणे, सहजपणे करणारी आपण एक मुलगी आहोत याचं भानसुद्धा आश्विनीला कधीच वाटायचं नाही. आपल्या आवडीपुढे तिने या गोष्टीचा कधीही विचार केला नाही.
कलेची आवड असलेल्या आश्विनीने कला क्षेत्रात करीअर केल्यानंतर मातोश्री प्रतिष्ठान येथे ‘एमबीए’चे शिक्षण घेत आहे. ज्यादातर पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या डिजिटल फोटोग्राफीच्या क्षेत्रात कौशल्य ‘क्लिक’ करत प्रचंड स्पर्धा आणि सतत नावीन्य असलेल्या डिजिटल फोटोग्राफीसारख्या व्यवसायात उतरून चेहऱ्यावरील अचूक संवेदना टिपण्याचे कौशल्य टिपत प्रोफेशनल फोटोग्राफर बनली आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे काम यशस्वीपणे करत आहे.

उदरनिर्वाहाचे साधन बनले
कोणाचाही विचार न करता केवळ हौस म्हणून पहिल्यांदा कॅमेरा हातात घेतला आणि हीच आवड आता शिक्षण शिकत तिच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. मुळात नवीन तंत्रज्ञानामुळे फोटोग्राफी व्यवसायाला नवा लुक मिळाला आहे. एकेकाळी कौटुंबिक, सार्वजनिक कार्यक्रमांत फोटोग्राफीचा वापर अधिक होता. आता प्रत्येक व्यक्तीच्या हातात आलेल्या स्मार्टफोनने फोटोग्राफी लयास जाण्याची परिस्थिती असताना ‘प्री-वेडिंग’ फोटोग्राफीची क्रेझ आली. त्यापाठोपाठ लग्नानंतरचे सोनेरी क्षण टिपण्याचा ट्रेंडही सुरू झाला. आता तर डोहाळे लागलेल्या पत्नीसोबत ‘प्री-मॅच्युर’ फोटो जतन करण्याच्या प्रेमात नवयुवक पडलेली आहेत. त्यातल्या फोटोग्राफर महिला असेल तर अधिकच उत्तम. एक मुलगी असून सुद्धा आपल्या कामात तिला संकोच कधीच वाटला नाही. आवड जेंव्हा आत्मविश्वास बनतो आणि आत्मविश्वासाला मेहनतीची जोड दिली तर यश नक्कीच मिळेल. एरव्ही पारंपरिक शिक्षण पद्धतीकडे वळणाऱ्या मुली अश्या प्रकाराचा मार्ग निवडू शकतात हे या वरुन दिसून येते.

माझी आवड, माझा व्यवसाय
पदवी शिक्षण घेत असताना भविष्यात काय करायचं ते कळत नव्हते. अनपेक्षित आवडीने कॅमेरा हातात घेतला. सहजच मग फोटोग्राफीचा छंद हा माझा व्यवसाय झाला. आवडीचे क्षेत्र निवडताना माझ्यासाठी हे क्षेत्र आव्हान ठरले नाही. एक मुलगी म्हणून मी कधीही ईतरांचा विचार केला नाही. माझी आवड, माझा व्यवसाय झाला आहे. त्यामुळे मुलींनी आपल्याला जे आवडते ते आपण केले पाहिजे.
- अश्विनी विठ्ठलराव डहाळे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com