esakal | सावजी बॅंकेची यशस्वी वाटचाल; आर्थिक वर्षात कमावला ४० कोटी नफा

बोलून बातमी शोधा

सावजी बॅंक

सावजी बॅंकेची यशस्वी वाटचाल; आर्थिक वर्षात कमावला ४० कोटी नफा

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर.

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : मराठवाड्यातील सहकारी क्षेत्रातील गेल्या अनेक वर्षापासूनच्या यशाची परंपरा कायम राखत येथील सुंदरलाल सावजी या मानांकित नागरी सहकारी बँकेने २०२०- २१ च्या आर्थिक वर्षात एकूण चाळीस कोटी नफा कमावला असून तो सर्व तरतुदी वजा जाता चौदा कोटी पंचवीस लाख एवढा निव्वळ नफा आहे. निव्वळ नफ्याचे खेळत्या भांडवलाचे प्रमाण मराठवाडा व विदर्भातील नॉन शेड्यूल्ड सहकारी बँकांपैकी सर्वात जास्त असल्याचा दावा बॅंक व्यवस्थापनाने केला आहे.

ता. ३१ मार्च २०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेकडे भागभांडवल व निधी २२२ कोटी असून १०८८ कोटी ९५ लाखाच्या ठेवी आहेत. हे बॅंकेच्या यशाचे प्रतिकच म्हणावे लागेल. शिवाय बँकेने ७४६ कोटी १८ लाख एवढे कर्ज वितरित केले. बँकेचा व्यवसाय १८०० कोटीचा झाला असून २००० कोटी व्यवसायाकडे बँकेची वाटचाल सुरु आहे. तर गेल्या वीस वर्षापासून नेट एनपीए राखण्याची परंपरा बँकेने याही वर्षी कायम ठेवली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मुकुंद सावजी कळमकर यांनी दिली.

हेही वाचा - शहाजीनगर जिल्हा परिषद कॉलनी येथील राहत्या घरी सापळा लावून झेडपीच्या प्रभारी कार्यकारी अभियंता महेश गुंडरे याला पंधरा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते.

अनेक पुरस्काराने बँक सन्मानित :

महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा 'सहकार- रत्न' पुरस्कार प्राप्त करणारी ही पहिली सहकारी बँक आहे. तसेच पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार सतत १७ वर्षे सावजी बँकेला प्राप्त झाले. याशिवाय बँकींग क्षेत्रातील अनेक पुरस्काराने बँकेला गौरवण्यात आले. सामाजिक क्षेत्रातही वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे सावजी बॅंकेने संस्थेची वेगळी ओळख निर्माण केली. संस्थेला विविध स्तरावरील हे यश बॅंकेचे सभासद, संचालक, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांच्या सहकार्याने मिळाले असल्याचे सांगून अध्यक्ष मुकुंद सावजी कळमकर यांनी या सर्वांचे आभार मानले.

संपादन- प्रल्हाद कांबळे