Mahavitaran News : महावितरणच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा : अपात्र एजन्सींना पात्र केल्याचा आरोप

सध्या धाराशिव येथील महावितरणकडे ही कामे करणाऱ्या २७० संस्था आहेत.
महावितरण लोगो
महावितरण लोगोsakal

धाराशिव : महावितरणने चालू वर्षी एका योजनेतून करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत लाखोंचा व्यवहार झाल्याची ओरड होत आहे. या प्रक्रियेत अपात्र असलेल्या ठेकेदारांना बोगस कागदपत्रांच्या आधारे पात्र ठरविण्यात आले तर पात्र ठेकेदारांना अपात्र करण्यात आले आहे. यात प्रत्येकी अडीच लाखांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे अन्याय झालेल्या ठेकेदारांची ओरड आहे.

महावितरण लोगो
Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

महावितरणच्या धाराशिव व तुळजापूर विभागात राबविण्यात आलेल्या या निविदा प्रक्रियेत हा गोंधळ संबंधित अधिकाऱ्यांनी घातला आहे. या निविदा प्रक्रियेसाठी शासनाने घालून दिलेल्या शर्ती, अटी व नियमांची पायमल्ली करत आपल्या अधिकारांचा गैरवापर करत, ज्या ठेकेदारांनी टेबलाखालून व्यवहार केले आहेत अशांच्याच निविदा मंजूर करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

महावितरण लोगो
MPSC News : एमपीएससीच्या अंतर्गत राजकारणाचा विद्यार्थांना फटका, परीक्षा रखडल्याने उमेदवारांचा आरोप; वाचला १८ समस्यांचा पाढा

सध्या धाराशिव येथील महावितरणकडे ही कामे करणाऱ्या २७० संस्था आहेत. या निविदा प्रक्रियेत ८९ संस्थांनी भाग घेतला होता. त्यापैकी ४७ संस्थांना पात्र करण्यात आले आहे. दरम्यान जिल्हा नियोजन समिती आणि अन्य शासकीय योजनांतून निविदा प्रक्रिया झालेल्या कामांचा खर्च करण्यात येत असतो. चालू वर्षांसाठी ही निविदा प्रक्रिया झालेली असली तरी यास आणखी एक वर्षांची मुदतवाढ देण्यात येत असते असे संबंधितांनी सांगितले आहे.

महावितरण लोगो
Jalgaon News : वाड्यापाड्यांवरील असंख्ये कुटुंबीये उघड्यावरच; ‘अच्छे दिन’पासून अजूनही दूर

या निविदा प्रक्रियेत एचटी (हाय टेन्शन), एलटी (लो टेन्शन), डिटीसी (डीपी) आदी कामे केली जाणार आहेत. एका वर्षासाठी जवळपास वीस कोटींहून अधिकच्या निधीची ही कामे केली जातात. त्यासाठी अनुभवी आणि या कामांत सातत्य असणाऱ्या पात्र एजन्सीजना ही कामे देण्यात येत असतात. मात्र अनुभवी आणि या कामात सातत्य असणाऱ्या एजन्सीजना यातून डावलण्यात आल्याची ओरड होत आहे.

महावितरण लोगो
Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

दरम्यान मुख्य अभियंत्यांनी या तक्रारीवर योग्य कारवाई न केल्यास महावितरणच्या मुंबई बांद्रा येथील व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यालयासमोर १५ मे पासून उपोषण करणार असल्याचा इशाराही या तक्रारीतून देण्यात आला आहे.

महावितरण लोगो
Jalgaon Banana News : केळीच्या बाजारभावात घसरण सुरूच; अनेक कारणांनी केळी उत्पादकांना बसतोय फटका

दरम्यान या निविदा प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात यावा. झालेली निविदा प्रक्रिया रद्द करावी. नव्याने निविदा मागवाव्यात. त्यासाठी सध्याच्या अधिकाऱ्यांना वगळून नवीन निविदा समिती गठीत करावी. अशी मागणी या प्रक्रियेत अपात्र करण्यात आलेल्या संबंधित एजन्सीनी लातूर स्थित महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे केली आहे. यात झालेल्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करत अनेक ठेकेदारांवर अन्याय केल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. यात महावितरणच्या धाराशिव विभागाचे लेखाधिकारी घुले आणि तुळजापूर विभागाचे लेखाधिकारी भिरंगे यांनी या घोटाळ्यात मुख्य भूमिका बाजावल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

म्हणे पारदर्शक आहे

या प्रकरणी तक्रार झाल्याचे मला माहित नाही. ती तक्रार अद्याप माझ्याकडे आलेली नाही. सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. पारदर्शक आहे. याबाबत कोणीही तक्रार करू शकतात.

- जोगदंड, कार्यकारी अभियंता, महावितरण, धाराशिव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com