esakal | Scam: नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना लाखो रुपयाला गंडविले

बोलून बातमी शोधा

thug}

'मी गिरीकंद ट्रॅव्हल्स मध्ये मोठ्या पदावर काम करत असून रुग्णवाहिकेवर ड्रायव्हर व वॉर्डबॉयची मोठी भरती करावयाची आहे त्याकरिता आपल्याला प्रथम ५ हजार रुपये मानधन मिळेल असे सांगितले.

marathwada
Scam: नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना लाखो रुपयाला गंडविले
sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब (उस्मानाबाद): नोकरीचे अमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरूणांना फसविणाऱ्या केज तालुक्यातील दीपेवडगाव येथील दीपक दिलीप कसबे या महाठगाविरुद्ध कळंब पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अटक करण्यात आली आहे. यामध्ये मोठे रॉकेट कार्यत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोना संसर्गामुळे टाळेबंदी करण्यात आली होती. यामुळे बेरोजगारी वाढली असून त्याचा फायदा उठवणारी संख्या वाढली आहे. बेरोजगारी वाढल्यामुळे कामधंदा करून आपल्या कुटुंबियांना काहीतरी फायदा होईल या उद्देशाने अलीकडच्या काळातील सुशिक्षित बेरोजगार तरुण हे एखाद्या माथेफिरूच्या बोलण्याच्या शैलीला कसे फसतात याचेच उदाहरण मंगळवार (ता.२) तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील तरुणांनी उघडकीस आणून नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणारे मोठे रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

उस्मानाबाद जिल्हा बँकेस शासकीय थकहमीच्या प्रस्तावास पहिल्या टप्प्यात वीस कोटी...

गेल्या १ ते २ महिन्यांपासून दिपक दिलीप कसबे (वय३५) रा.दिपेवडगाव ता.केज जि.बीड याने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना 'मी गिरीकंद ट्रॅव्हल्स मध्ये मोठ्या पदावर काम करत असून रुग्णवाहिकेवर ड्रायव्हर व वॉर्डबॉयची मोठी भरती करावयाची आहे त्याकरिता आपल्याला प्रथम ५ हजार रुपये मानधन मिळेल असे सांगितले.आधार कार्ड, पॅनकार्ड व ड्रायव्हिंग लायन्सेसची सत्यप्रत घेऊन पुणे येथील ससून हस्पिटलमध्ये नियुक्त पत्र, ड्रेस, ओळखपत्र देतो असे सांगितले.

यावरून संबंधित फसलेले तरुण पुणे येथे ठरलेल्या ससून हॉस्पिटल येथे गेले असता, या महाठगाने नियुक्ती पत्र, ड्रेस, ओळखपत्र देण्याचा एक हॉल दाखविला दाखविला. या ठिकाणी या तरुणांना शंका आली. तरुणांनी याबाबत  चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. काही वेळात नोकरीचे आमिष दाखविणारा महाठग या ठिकाणीहून गायब झाला. कळंब तालुक्यासह, बार्शी, अंबाजोगाई, दिघोळ अंबा, येरमाळा, केज, वाशी येथील तरुणांना नोकरी लावतो म्हणून फसविले असल्याची शक्यता आहे.

परभणी महापालिका हद्दीतील एक हजार 305 अतिक्रमणे हटविणार- नगरविकास मंत्री एकनाथ...

यामध्ये मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना आहे. ससून हॉस्पिटल मधून गायब झालेल्या महाठगाला दोन दिवसांपूर्वी तरुणांनी गावातच गाठले. त्याची अधिक चौकशी केली असता प्रश्नांची समर्पक उत्तरे देवू न शकल्याने फसलेल्या तरुणांनी त्याला गोडबोलून कळंब पोलीसाच्या मंगळवारी ताब्यात दिले.याप्रकरण राजेंद्र पांडुरंग बारगुले यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलिस ठाण्यात दिपक दिलीप कसबे याच्याविरुद्ध मंगळवार (ता.२) रात्री भारतीय दंडासहिता नुसार कलम ४२०,३४ गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक तानाजी दराडे करत आहेत