
दहावी, बारावीच्या परीक्षा तारखा राज्य मंडळाने जाहीर केल्या आहेत. यामुळे सदर वर्ग प्रत्यक्ष सुरुच राहणार आहेत.
जालना : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता पाचवी ते नववी वर्गासह निवासी शाळा ता.३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मंगळवारी (ता.२३) सूचना दिल्या आहेत.जिल्ह्यात चार दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बिनवडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागातील अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलविण्यात आली होती.
वाचा - औरंगाबादकरांनो! आजपासून शहरात रात्रीची संचारबंदी होणार लागू
जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार करता पुढील मार्च महिन्यातील ता.३१ पर्यंत पाचवी ते नववीचे वर्ग बंद करण्यात यावेत अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. दहावी बारावीच्या परीक्षा तारखा राज्य मंडळाने जाहीर केल्या आहेत. यामुळे सदर वर्ग प्रत्यक्ष सुरुच राहणार आहेत. जिल्ह्यातील निवासी शाळा बंद करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. इयत्ता पाचवी ते नववीचे वर्ग ऑनलाइन घेण्यात यावेत असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाचा - खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण; सोशल मीडियावरून दिली माहिती
जिल्ह्यातील पाचवी ते नववीचे वर्ग बंद करण्यात येणार असले तरी शिक्षकांना मात्र कर्तव्यावर हजर राहावे लागेल असेही शिक्षणाधिकारी यांनी सांगितले. शहरात कोरोना संसर्गजन्य परिस्थिती गंभीर बनत असल्याने शहरातील शाळांच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थी खबरदारी व उपाययोजना करणे कठीण जात असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. दरम्यान पाचवी ते नववीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शहरातील शाळांचा ताण काहीसा कमी झाला असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.
वाचा - पहिली ग्रामपंचायत बैठक ठरली शेवटची...! अपघातात ग्रामपंचायत महिला सदस्या जागीच ठार
आज जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. बैठकीत विविध सूचना देत जिल्ह्यातील दहावी व बारावी वर्ग वगळता इतर वर्ग ता.३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात यावेत, अशा सूचना बैठकीत दिल्या आहेत.
- आशा गरुड, शिक्षणाधिकारी, जालना
संपादन - गणेश पिटेकर