Marathwada : ''टीईटी'' परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tet exam
''टीईटी'' परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू

''टीईटी'' परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : शहरात रविवारी (ता. २१) होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले असून शंभर मिटर परिसरातील झेरॉक्स, फॅक्स, ध्वनीक्षेपक दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बजावले आहेत. शहरातील ३५ परीक्षा केंद्रावर रविवारी (ता. २१) सकाळ व दुपार सत्रात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होणार असून दहा हजारावर विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात कलम १४४ लागू केले आहे. तसेच परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरातील सर्व दूरध्वनी, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स, झेरॉक्स व ध्वनीक्षेपके बंद ठेवण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत हे आदेश लागू राहतील. हे आदेश परीक्षार्थी, परीक्षेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाही. जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले, शिक्षणाधिकारी आशा गरुड, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे आदी परिक्षा सुरळीत होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शनिवारी (ता. २०) शहरातील सर्व परीक्षा केंद्रावर केंद्र प्रमुखांनी नियुक्ती दिलेल्या कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. परीक्षा केंद्राचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता करण्यात आली. बहुतांश ठिकाणी नियुक्त समन्यकांची उपस्थिती होती.

loading image
go to top