esakal | हिंगोलीत स्वस्त धान्य दुकानाचा गहू ट्रकसह जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुरुवारी (ता. चार) गोपनीय माहिती मिळाली. हिंगोली ते औंढा नागनाथ जाणारे रस्त्यावर लिंबाळा एमआयडीसी येथे ट्रकमध्ये (क्रमांक एम.एच. २६ - बी ई २९३५) वाशिम जिल्ह्यामधून स्वस्त धान्य दुकानातील गहू सदर वाहनामध्ये घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. 

हिंगोलीत स्वस्त धान्य दुकानाचा गहू ट्रकसह जप्त

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली - हिंगोली ते औंढा मार्गावर लिंबाळा एमआयडीसी भागात स्वस्त धान्य दुकानातील गहू काळ्या बाजारात घेऊन जाणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी (ता. सहा) पकडला. या प्रकरणात २७ लाख तीन हजार ५९३ रुपयाच्या मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतर्फे देण्यात आली आहे. 

हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुरुवारी (ता. चार) गोपनीय माहिती मिळाली. हिंगोली ते औंढा नागनाथ जाणारे रस्त्यावर लिंबाळा एमआयडीसी येथे ट्रकमध्ये (क्रमांक एम.एच. २६ - बी ई २९३५) वाशिम जिल्ह्यामधून स्वस्त धान्य दुकानातील गहू सदर वाहनामध्ये घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. 

हेही वाचा - नांदेड - मध्यवर्ती बसस्थानकातील विश्रामगृहात सुविधांची वानवा

ट्रकचालकाची केली चौकशी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रक थांबवून चालकास विचारपूस केली असता त्याने सदर ट्रकमध्ये गहू असून मंगरूळपीर (जि. वाशीम) येथून आल्याचे सांगून त्याच्याकडील मालाबाबतच्या पावत्या दाखवल्या. त्यावेळी सदर गहु व पावत्याबाबत संशय आल्याने ट्रकमधील मालाची पहाणी केली असता त्यात ३४१ क्विंटल गहू आढळून आला. त्यात ५५ किलो वजनाचे ३४० पोत्यामध्ये असलेले गहु असून त्याची एकूण किंमत २७ लाख तीन हजार ५९३ आहे. स्वस्त धान्य दुकानातील गहु असल्याचा संशय आल्याने सदर ट्रक हा हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात चौकशीकामी लावण्यात आला.

हेही वाचलेच पाहिजे - पोखर्णी नृसिंह फाटा येथे रास्ता रोको; शेतकरी विरोधी कायदे रद्दची मागणी
 

पावत्यांची केली पडताळणी
दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक के. डी. पोटे यांच्यासोबत एक पथक तयार करून मंगरूळपीर येथे गेले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांना सदर पावत्या दाखवून चौकशी केली. सदर पावत्या बनावट असल्याचे समजले. स्वस्त धान्य दुकानातील गहू असल्याचा संशय आल्याने सदर ट्रकचालक किशन धुळगुंडे (रा. लोहा, जि. नांदेड) याच्याकडून ट्रक आणि ट्रकमधील गहू व बनावट पावत्या असा एकुण २७ लाख तीन हजार ५९३ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या आहे. फौजदार के. डी. पोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किशन धुळगुंडे, विनोद उर्फ रवी जाधव याचा मुनिम यांच्याविरूध्द हिंगोली ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उदय खंडेराय करत आहेत. 

संपादन - अभय कुळकजाईकर

loading image