
यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार पांडूरंग माचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.
हिंगोली : तालुक्यातील तिसऱ्या टप्प्यात सोमवारी ( ता. १५) १९ ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंचाची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार पांडूरंग माचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.
सरपंच व उपसरपंचाची नावे पुढील प्रमाणे
उमरखोजा- राधाबाई चौधरी, लता चव्हाण, सवड- गणेश थोरात, लता सरकटे, खंडाळा- पुष्पा गायकवाड, भगवान कांबळे, समगा- सागर इंगळे, बळीराम सरकटे, लासिना- वनमाला काळे, आनंदराव जाधव, टाकळी तर्फे नांदापुर - राणी बेगाळ, भुषन पाईकराव, बळसोंड- शैलेश जैस्वाल, ताराबाई चव्हाण, नांदुरा- मिराबाई तनपुरे, लक्ष्मण तनपुरे, सावरखेडा- सरस्वती हरण, सुरेखा पाईकराव, गाडीबोरी- त्रिशुला कहाळे, आशाबाई देवकर, जांभरुन तांडा- दिगंबर राठोड, विठ्ठल राठोड, केसापुर केवळाबाई शिंदे, पद्माबाई बनसोडे, बोंडाळा- कांताबाई जाधव, सुनिता भाकरे, चिंचोली- अनुसया राठोड, ज्ञानदिप इंगोले, देऊळगाव रामा- कान्होपात्रा पुरी, प्रकाश दिपके, इसापुर- गंगुबाई जगताप, प्रदीप राठोड, भोगाव- अश्विनी घुगे, रवी पुरी, कलगाव- राधीका घुमनर, सविता निळकंठ, घुमनर हिरडी- ज्योती थोरात, रामेश्वर लांडगे यांची निवड करण्यात आली आहे.
हेही वाचा - आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत; “एक जिल्हा एक उत्पादन” योजना
सुकळीविर येथे सरपंच पदि डाॅ. शेख इसा यांची बिनविरोध निवड
वारंगाफाटा : सुकळीविर ग्रामपंचायत सरपंच पदी डाॅ. शेख इसा यांची तर उपसरपंच पदी मीना धुमाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
हट्टा गावच्या सरपंचपदी सारिका खाडे
हट्टा : येथील सरपंचपदी सारिका खाडे तर उपसरपंचपदी पार्वती पवार यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचितांचा सत्कार करण्यात आला.
संपादन - प्रल्हाद कांबळे