esakal | सेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांचा भाजपला जय श्रीराम, लवकरच शिवबंधनात
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सन- २०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी पक्ष सोडत ऐनवेळी भारतीय जनता पक्षाकडून जिंतूर विधानसभा मतदार संघात उमेदवारी घेऊन चांगले मतदान घेतले होते.

सेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांचा भाजपला जय श्रीराम, लवकरच शिवबंधनात

sakal_logo
By
संजय मुंडे

वालूर ( ता. सेलू जिल्हा परभणी ) : भारतीय जनता पक्षाचे सेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राजकीय क्षेत्रात पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या सुरु असलेल्या चर्चेस अखेर पुर्णविराम मिळाला आहे. 

सन- २०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी पक्ष सोडत ऐनवेळी भारतीय जनता पक्षाकडून जिंतूर विधानसभा मतदार संघात उमेदवारी घेऊन चांगले मतदान घेतले होते. दरम्यान सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी नंतर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व संजय साडेगावकर यांच्यात काही प्रमाणात मतभेद उद्भवल्याची चर्चा तालुक्यात काही दिवसापासून सुरु होती. सन- २०१९ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी संजय साडेगावकर दावेदार होते. परंतु माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर (साकोरे) यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मेघना बोर्डीकर (साकोरे) यांना पक्षाने उमेदवारी दिली. अखेर श्री साडेगावकर यांना पक्षात काम करण्याची इच्छा राहिली नाही असे नमूद करुन तालुकाध्यक्ष पदाचा राजिनामा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डाॅ.सुभाष कदम, जिल्हा महामंत्री शशिकांत देशपांडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. 

हेही वाचा शिवेंद्रसिंहराजेच नाही, तर अनेक नेते राष्ट्रवादीत येणार; शरद पवारांच्या विश्वासू नेत्याचा पक्का दावा

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत संजय साडेगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह भाजप कार्यकर्त्यांना सोबत घेऊन १७ पैकी ११ जागा मिळवत ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न यशस्वी केला. प्रचार सभेत मी महाविकास आघाडी असलेल्या पक्षात प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले. काही दिवसांपासून खासदार संजय जाधव यांच्याशी संपर्कात राहात असलेले संजय साडेगावकर यांचा स्वगृही म्हणजे पुन्हा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची चर्चा होत आहे. 
- संजय साडेगावकर 
 

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image