

Homicide and Multiple Robberies on Farms Rock Selu Taluka; Police Investigate
Sakal
सेलू : सेलू तालुक्यातील वालूर येथील शेत शिवारातील आखाड्यावरील हल्ल्यात २४ वर्षीय नातवाचा खून झाला असून ७५ वर्षीय आजी जखमी झाली तर दरम्यान याच परिसरातील शेत आखाड्यावरील श्री कृष्ण मंदिरात असलेल्या वृद्ध दाम्पत्यावर खुनी हल्ला करून दागिने लंपास केले. तसेच शेतात पिकास पाणी देत असलेल्या एकास शस्त्राचा धाक दाखविला. जवळच असलेल्या पारडी (कौसडी) गावाजवळील शेतातील असलेल्या आखाड्याचा घरासमोरील दुचाकी पळविली. या दरोड्याचा प्रकरणाची घटना गुरूवारी (ता. २३) रात्री १२. ३० ते दोन वाजण्याचा सुमारास घडली असून यामुळे मोठी खळबळ उडाली असून शेत आखाड्यावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २५ ते ३५ वर्षे वयोगटातील दोन तीन अज्ञात अंगात बनियन व पॅन्ट घातलेले अज्ञात चोरट्यांनी हल्ला केल्याचा संशय आहे.