सेनगावात चार एकर तुरीचे पिक जळून खाक, लाखोंची नुकसान

विठ्ठल देशमुख
Friday, 22 January 2021

सेनगाव येथील शेतकरी आनंदराव देशमुख यांच्या चार एकरातील तुरीला अचानक आग लागून संपूर्ण तुर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

सेनगाव (जिल्हा हिंगोली) : अगोदरच लहरी निसर्गाच्या झपाट्यात सापडलेला शेतकरी हवालदिल झाल आहे. त्यातच अस्मानी व सुलतानी संकटाचे घाव झेलत तो कसाबसा तग धरुन आहे. मात्र अशा शेतकऱ्यांवर आकस्मिक संकट कोसळत आहेत. त्यातील सेनगाव येथील शेतकरी आनंदराव देशमुख यांच्या चार एकरातील तुरीला अचानक आग लागून संपूर्ण तुर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

यंदा अतिवृष्टिमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच गुरुवारी ( ता. २१) सेनगाव शहरातील आनंदराव देशमुख यांच्या गट नंबर ८८ मधील चार एकरमध्ये असलेल्या तुरीच्या उभ्या पिकाला अचानक आग लागल्याने काढणीला आलेली तुर या आगीत संपूर्ण जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. 

हेही वाचा - धक्कादायक : पत्नीचा जाळुन खून करणाऱ्या पतीवर गुन्हा, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील घटना

शेतकरी आनंदराव देशमुख हे घरी असल्यामुळे त्यांना या घटनेची माहिती उशिरा मिळाली.  ही आग का व कशी लागली. याचा शोध अद्याप कुणालाही लागला नाही. परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणने आहे की, सध्या उन्हाचा कडाका सुरु आहे. आणि तुर पिक सुध्दा काढणीला आलेले होते. त्यामुळे या अभ्या पिकाला वणवा लागला असा अंदाज वर्तवला जात आहे. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन संबंधित शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन  याचा पंचनामा करून या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Sengaon, burn four acres of trumpet crop hingoli news