सेवानिवृत्त सैनिकावर फुलांचा वर्षाव, वाजत-गाजत काढली मिरवणूक | Hingoli News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli News

सेवानिवृत्त सैनिकावर फुलांचा वर्षाव, वाजत-गाजत काढली मिरवणूक

सेनगाव (जि.हिंगोली) : येथील सुपुत्र राम वाणी यांनी सैन्यदलात प्राणांची पर्वा न करता अहोरात्र देशाच्या सीमांचं २६ वर्षे रक्षण केले. ते गुरुवारी (ता.सहा) रात्री भारतीय सैन्यदलातून (Indian Army) सेवानिवृत्त होऊन सेनगाव येथे परत आले. त्यावेळी सेनगाव (Sengaon) येथील नागरिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत वाजत-गाजत मिरवणूक काढून त्यांचा सपत्नीक सत्कार केला. देशसेवा (Hingoli) करताना निवृत्त झालेल्या सैनिकांची छाती या आगळ्यावेगळ्या सन्मानाने फुलून आली. या वेळी भावना मोकळ्या करताना आनंदाश्रूही आले. भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात.(Sengaon Residents Welcomes Retired Jawan In Hingoli)

अशा सैनिकांचा ग्रामस्थांना अभिमान असल्याने त्यांचा आदर्श गावातील नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा. या हेतूने सेवानिवृत्त सैनिकांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करण्याचे ठरविले होते. यावेळी गावातील महिला, पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते. नागरिकांचा उत्साह पाहून तेही भावुक झाले. 'भारत माता की जय' असा जयघोष करीत व वाद्यवृंदांच्या साथीने गावात ही मिरवणूक निघाली. गावात ध्वज पताकाही लावण्यात आल्या. मिरवणूकीत देशभक्तीच्या वातावरणात महिलांनी या सैनिकांचे औक्षणही केले.

टॅग्स :Hingoliindian army