esakal | Video : 'या' आजारामुळे ज्येष्ठांची काळजी घेणे आवश्‍यक
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोरोना संसर्गाचा ज्येष्ठांना असलेला धोका टाळण्यासाठी कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दूर ठेवावे लागणार आहे. त्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांनी दक्ष राहण्याची गरज आहे.

Video : 'या' आजारामुळे ज्येष्ठांची काळजी घेणे आवश्‍यक

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रत्येकाने सहभागी होऊन शासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते, त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. वयोमानानुसार कमी झालेली रोगप्रतिकारकशक्ती हे महत्त्वाचे कारण असले तरी, अनेक ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीशी संबंधित आजार, दमा किंवा श्वसनाचे विकार आदी प्रकारच्या व्याधी असतात. 

ज्येष्ठांना मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सामाजिक, आर्थिक आणि वैद्यकीय स्थिती हे तीन घटक अतिशय महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ नागरिकांची सेकंड इनिंग आनंदी व सुखात जावी, तसेच त्यांची घरात घुसमट होऊ नये, यासाठी प्रत्येक शहरांमध्ये ज्येष्ठ नागरिक मंडळे, संघ कार्यरत आहेत. त्यात आप्तस्वकियांनी दूर लोटलेल्या वृद्धांना मानसिक आधार दिला जातो. वास्तविक पाहता संयुक्त कुटुंबात ज्येष्ठ नागरिकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. अडचणीच्या काळात मुलाला त्यांचा सल्ला मार्गदर्शक ठरू शकतो. मात्र, अनेक मुलांना बापाची लुडबुड नको असते. वास्तविक पाहता ज्येष्ठांचा अनुभव लक्क्षात घेता त्यांचा सल्ला निमुटपणे ऐकूण घ्यायला पाहिजे. तरच बाप आणि मुलाच्या नात्यातील गोडवा कायम राहू शकतो.  

लॉकडाउनमध्ये ज्येष्ठांची काळजी आवश्‍यकच
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. लाॅकडाउन आणि संचारबंदीसारख्या उपाययोजनांतून कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.  वाढत्या वयासोबत निमोनिया होणे ही सामान्य गोष्ट आहे. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याने ज्येष्ठांना हा आजार होऊ शकतो. डायबिटीजच्या ज्येष्ठ रुग्णांना ही समस्या होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. यामुळे छातीमध्ये इन्फेक्शन होते. त्यासाठी ज्येष्ठांना वेळेवळ सकस आहार, गोळ्या तसेच त्यांच्या व्यायामाकडे लक्ष्य देण्याची आज गरज आहे.

हेही वाचा - एका पॉझिटीव्हमुळे मोंढा बाजार झाला निगेटीव्ह

पूर्वी कुटुंबात ज्येष्ठांचे स्थान होते महत्त्वाचे
भारतात पूर्वी कृषी प्रधान अर्थव्यवस्थेत ज्येष्ठांचे स्थान महत्त्वाचे होते. त्यांचा सल्ला महत्त्वाचा मानला जात होता. त्यांचे ज्ञान, अनुभव हे ज्ञानकोश, मार्गदर्शक समजले जात. संयुक्त कुटुंबात त्यांचा भीतीयुक्त आदर असे. ज्येष्ठ जाती पंचायतीचा सदस्य असे ते न्यायदानाच्या कामात मदत करत. गावचा कारभार ज्येष्ठांच्या उपदेशाने चालत असे. भारतीय पारंपारिक जीवनात ज्येष्ठांची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका होती. ते सामाजिक जीवनात वंदनीय होते.

ज्येष्ठांच्या समस्या झाल्यात जटील
भारतीय समाजात ज्येष्ठांची सांभाळ करणारी पारंपारिक व्यवस्था होती. त्यामुळे ज्येष्ठांचा प्रश्न निर्माण झाला नव्हता. परंतु औद्योगिक क्रांतीनंतर भारतीय समाजात जो आमूलाग्र बदल होऊन शहरीकरण, औद्योगिकरणाची प्रक्रिया दृढमूल झाली. त्यातून संयुक्त कुटुंब, नातेवाईकांचा गट, धार्मिक संस्था प्रभावित झाल्या. ज्येष्ठांच्या कल्याणात शतकानुशतके अग्रेसर असणाऱ्या या संस्था विघटीत होऊ लागल्या. नवी सामाजिक मूल्ये, व्यक्तीवादी विचारसरणीचे प्रचलन झाले. यातूनच कुटुंबात ज्येष्ठांची अडचण भासू लागली . ज्येष्ठांनी वेगळे रहावे. आमच्या कुटुंबात हस्तक्षेप करू नये, अशी मागणी होऊ लागली. परिणामी ज्येष्ठांच्या समस्या अधिकच जटील होत चालल्या आहेत.

येथे क्लिक करा - Video-लॉकडाउन : ऐन हंगामात कुंभार व्यावसायिक अडचणीत, कसे? ते वाचा

ज्येष्ठांनी कुटुंबात रहाताना नातवंडांबरोबर खेळले पाहिजे. सदस्यांसोबत संवाद साधला पाहिजे. सदस्यांनीही ज्येष्ठांची विशेष काळजी घेतली पाहिजे. वेळ घालवण्यासाठी महिलांनी कादंबऱ्या वाचाव्यात, उन्हाळ्यातील वाळवणाची कामे करावीत. असे नियोजन केले तरच आनंदी जीवन जगता येणे शक्य होईल.                                                       - भागीरथी बच्चेवार, सचिव (ज्येष्ठ नागरिक संघ, वजिराबाद नांदेड)

loading image