खळबळ : नांदेडात शिक्षकाची आत्महत्या 

प्रल्हाद कांबळे
Thursday, 23 April 2020

 

 कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भगवंतनगर गजानन मंदीर परिसरात बुधवारी (ता. २२) दुपारी घडली. 

नांदेड : खासगी शाळेवर सहशिक्षक म्हणून असलेल्या अनिल क्यादरकुंठे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भगवंतनगर गजानन मंदीर परिसरात बुधवारी (ता. २२) दुपारी घडली. मयत शिक्षक हा मुखेड येथील रहिवाशी होता.

मुखेड येथील अनिल सुर्यकांत क्यादरकुंठे (वय ४८) हे नांदेडच्या एका खासगी शैक्षणिक संस्थेवर सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. नांदेडच्या गजानन मंदीर परिसरात असलेल्या भगवंतनगर भागात किरायाने आपल्या कुटुंबासह राहत होता. मात्र ते कर्जबाजारी झाले होते. बँकेचे कर्ज काढले परंतु त्या कर्जाची परतफेड ते करु शकत नव्हते. अखेर त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. शेवटी बुधवारी (ता. २३) दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

भाग्यनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाग्यनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. उत्तरीय तपासणी झाल्यानंतर सदरचा मृतदेह पोलिसांनी नातेवाईकांच्या स्वाधीन केला. मयताचे वडील सुर्यकांत क्यादरकुंठे यांच्या माहितीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक श्री. सुतारे करत आहेत.  

हेही वाचामुस्लिम बांधवांनी रमजानमध्ये शासनाच्या सूचनांचे पालन करावे- विजकुमार मगर

बिजलवाडीत आठ जुगाऱ्यांवर कार्यवाही

मरखेल : तालुक्यातील सीमावर्ती भागात सध्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर रिकामटेकड्या लोकांकडून उपद्रव माजविला जात आहे. सध्या या आजाराच्या काळात ठिकठिकाणी जुगार खेळला व खेळविला जात असून मरखेल पोलिसांकडून जुगार अड्ड्यांवर ठिकठिकाणी छापे टाकून जुगाऱ्यांवर कार्यवाही केली जात आहे. 

बुधवारी (ता. २२) बिजलवाडी शिवारात जुगार खेळणाऱ्या आठ लोकांसह त्यांना सहकार्य करणाऱ्या शेतमालकावर मरखेल पोलिसांनी कार्यवाही करीत ताब्यात घेतले आहे. प्राप्त माहितीनुसार बिजलवाडी शिवारातील सुनील गनिमे यांच्या कापसाचे शेतात (ता. २२) रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास यातील हणमंत त्रंबक द्याडे, शांतीकुमार हणमंत द्याडे, दिलीप गणपतराव तरफदार, हणमारेड्डी तिप्पारेड्डी वासरे, अशोक नागरेड्डी दोंगाले, शिवराज शंकर चिमकुडे, शंकर बाबूराव लोहार, सुनील पीररेड्डी आंबाटे हे तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याच्या माहितीवरून सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर यांच्या पथकाने धाड टाकून सदरील जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्याच्याजवळील जुगाराचे साहित्य व पाच हजार सातशे रुपये जप्त केले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensation: Teacher commits suicide in Nanded