- रविंद्र गायकवाड
बिडकीन - पैठण तालुक्यातील चितेगाव परिसरात उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने सर्वत्र खळबळ माजवली आहे. अकबर महेबूब शेख (वय ४५, उर्फ मियाभाई) या चितेगावमधील रहिवाशाचा अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी या गुन्ह्याशी संबंधित ६ जणांना ताब्यात घेतले आहे.