esakal | वृध्द महिलांचा खून करुन दागीने लुटणाऱ्या सिरियल किलरला अटक; हिंगोली पोलिसांची कारवाई 

बोलून बातमी शोधा

file photo

साखरा येथे वयोवृद्ध अर्धवट पुरलेल्या अवस्थेत प्रेत मिळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

वृध्द महिलांचा खून करुन दागीने लुटणाऱ्या सिरियल किलरला अटक; हिंगोली पोलिसांची कारवाई 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील साखरा शेत शिवारात एका वयोवृध्द महिलेचा खून करुन दागीने लुटणाऱ्या सिरियल किलरचा छडा लावून गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्याची माहिती सोमवार (ता. १२) पोलिस प्रशासनातर्फे देण्यात आली. 

साखरा येथे वयोवृद्ध अर्धवट पुरलेल्या अवस्थेत प्रेत मिळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तसेच यापूर्वी सुध्दा ऑगष्ट २०२० मध्ये साखरा येथील एका वयोवृध्द महिलेचा स्वत: च्या घरामध्ये रात्रीच्या सुमारास खून करुन तिचे अंगावरील दागीणे लुटून नेले होते. सदर घटनेचा अद्याप छडा लागला नव्हता. एका पाठोपाठ एक असे सलग दोन खून झाले होते. एकटे रहाणाऱ्या वयोवृध्द महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. अनेक दिवस तपास करुनसुध्दा सदरचा खून उघड झालेला नव्हता.

हेही वाचा हिंगोली : कला ही मुलांना स्वतः च्या पायावर उभं करते- चित्रकार शिवराज जगताप

पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सदरचे सिरीयल खून उघड करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांना योग्य त्या सूचना देवून पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान आडे, राजू ठाकुर, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, ज्ञानेवश्वर पायघण यांचेसह एक विशेष पथक तयार करुन सदर गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. उदय खंडेराय व शिवसांब घेवारे हे पथकासह घटनास्थळी भेट देउन मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन मयताची ओळख पटवून मयत भारजाबाई इंगळे (वय ८२) रा. साखरा ही असल्याचे निष्पन्न करुन फिर्यादी  सुरेश इंगळे रा. साखरा यांनी त्यांची आई भारजाबाई हिस कोणीतरी अज्ञात इसमाने तिचे अंगावरील सोन्याचांदीचे दागीणे काढून तिचे कपाळावर व चेहऱ्यावर मारुन निघुन खून केला.

पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मयत हिचे प्रेत खड्यात पुरुन टाकल्याचे दिसून आले. सेनगांव येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी महत्वाचे धागेदोरे जमा करुन गुप्त माहिती घेतली असता सदर गुन्ह्यातील आरोपी हा दिलीप लाटे रा. साखरा असल्याचे निष्पन्न झाले. त्यास ताब्यात घेउन वयोवृध्द महिलेच्या खूनाबद्दल विचारपूस केली असता त्याने सदरचा खून वृध्द माहिलेच्या अंगावरील सोने लुटून पैशासाठी खून केला असल्याची कबुली दिली. तसेच सदरचा खून करण्यापूर्वी सदर वृध्दे महिलेस झोपेच्या गोळ्या खाउ घालून तिला बेशुध्द करुन तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत माळरानावरील खड्ड्यात पुरल्याचे कबुल केले. त्यावेळी त्यास अधिक विश्वासात घेउन यापूर्वी ऑगष्ट महिन्यात साखरा येथील वृध्द महिलेचा खूनाबद्दल विचारपूस केली. मनकर्णाबाई सरुळे हिचे घरात घूसून सरकारी योजनेची माहिती सांगण्याचा बहाणा करुन तिचे डोक्यात दगड घालून जीवंत मारले व तीचे अंगावरील सोन्याचे दागीणे काढून घेतल्याचे कबुली दिल्याने साखर येथील दोन उघडकीस न आलेले खून अखेर उघड झाल्याने सेनगांव परिसरातील लोकांमधील भितीचे वातावरण दूर झाले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे