esakal | एक भेट आपुलकीची नात्यापलीकडची एक करंजी मोलाची : गरजूंना साडी चोळी, मुलांना कपडे वाटप
sakal

बोलून बातमी शोधा

The service organization in Ambad distributes Diwali Farals and firecrackers to the needy on Diwali.jpg

येथील उपजिल्हा रुग्णालयात एक कार्यक्रमातुन गरजूंना मदत करण्याची इच्छा असलेली समविचारी मंडळी गेल्या सात वर्षांपासून एकत्रित येत मारवाडी महिला युवा मंच, रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी आणि समाजभान टीमद्वारे ज्यांची साधे कपडे देखील घेण्याची आर्थिक परिस्थिती नसेल.

एक भेट आपुलकीची नात्यापलीकडची एक करंजी मोलाची : गरजूंना साडी चोळी, मुलांना कपडे वाटप

sakal_logo
By
बाबासाहेब गोंटे

अंबड (जालना) :  गरीब गरजूंना मदतीचा हात देणारे संघटना व समाजाचे आपण काही देणे लागतो. या उक्ती प्रमाणे काम करणाऱ्या सेवासंघटना गेल्या सात वर्षांपासून दिवाळी निमित्ताने गरजू ,निराधार मुलां-मुलींना व महिलांना ड्रेस, साडी, दिवाळी फराळ, फटाके वाटप करतात. यंदाच्या दिवाळीतही गरीब गरजूंना मदतीचा हात देत उपजिल्हा रुग्णालयात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अधीक्षक डॉ. जे ए तलवाडकर, प्राचार्य डॉ शिवशंकर घुमरे, प्रा.मिलिंद पंडित, निलेश लोहिया, राजीव डोंगरे आदींची विशेष उपस्थिती होती. 

येथील उपजिल्हा रुग्णालयात एक कार्यक्रमातुन गरजूंना मदत करण्याची इच्छा असलेली समविचारी मंडळी गेल्या सात वर्षांपासून एकत्रित येत मारवाडी महिला युवा मंच, रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी आणि समाजभान टीमद्वारे ज्यांची साधे कपडे देखील घेण्याची आर्थिक परिस्थिती नसेल. अशा गरीब गरजुंसाठी मदतीचा हात देत आहे. मारवाडी महिला युवा मंच तर्फ़े साडी आणि मिठाई बॉक्स तर उपजिल्हा रुग्णालयातर्फ़े मुलामुलींना ड्रेस तर समाजभान टीम तर्फे, साडी, दिवाळी फराळ आणि फटाके देत ʻएक भेट आपुलकीची,आपल्या नात्यापलीकडचीʼ, ʻएक करंजी मोलाचीʼ असे अनेक उपक्रम अनेक ठिकाणी यशस्वीरित्या राबविले आहेत. 35 मुलामुलींना ड्रेस तर 45 महिलांना साडी, दिवाळी फराळ, देण्यात आले. 

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम वादे, प्रस्तावना विजय बनसोडे यांनी केले तर आभार राहुल झेंडेकर यांनी मानले. तर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात कृष्णा वानखेडे, अनिल भागवत, प्रशांत जाधव, राजू शिलवंत, संदीप वाळवे, के. बी. बारे व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image