परभणीच्या वैश्य बॅंकेकडून सात लाखांची मदत

file photo
file photo
Updated on

परभणी : राज्यातील सहकार क्षेत्रात नावाजलेल्या परभणी येथील वैश्य नागरी सहकारी बॅंकेच्या वतीने पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाखाची भरघोस मदत दिली आहे. या निधीचे धनादेश बॅंकेचे अध्यक्ष सुधाकरराव चिद्रवार यांनी बुधवारी (ता.१५) जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.
परभणी येथील वैश्य नागरी सहकारी बॅंकेच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव उपाययोजन करण्यासाठी मोठ्या निधी दिली आहे. मंगळवारी (ता.१४) बॅंकेच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करण्याचे ठरले.

जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेश सुपूर्द 
 यात पंतप्रधान सहायता निधीसाठी बॅंकेच्या वतीने पाच लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीचे धनादेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे बुधवारी (ता. १५) सुपूर्द करण्यात आला. 
या वेळी वैश्य नागरी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सुधाकर चिद्रवार, उपाध्यक्ष उदय कत्रुवार, संचालक सीताराम गुंडलवार, डॉ. राजकुमार कलकोटे, विवेक वट्टमवार, अजित वट्टमवार, नंदकुमार चिद्रवार, विश्र्वनाथ गव्हाणे व बॅंकेचे सरव्यवस्थापक देविदास देशपांडे यांची उपस्थिती होती. 


हेही वाचा -​ धक्कादायक : परभणी आढळला कोरोना बाधीत पहिला रुग्ण


‘सिद्धीविनायक’तर्फे एक लाखाची मदत
परभणी :
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार येथील विद्यानगर भागातील सिद्धीविनायक मंदिर संस्थानच्या वतीने सोमवारी (ता. १३) कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पंतप्रधान केअरसाठी एक लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी मंदिर संस्थानचे सचिव विजय जोशी, राजू परिहार, प्रकाश पेडगावकर, अनंतराव राजूरकर, शरद नाकाडे यांच्यसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा...

बाजार समितीत सॅनिटायझर कक्ष
जिंतूर (जि.परभणी) :
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेश गेटवर गुरुवारी (ता. १६) सॅनिटायझर कक्ष उभारण्यात आला.
जिंतूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परिसरातील शेकडो खेड्यांतील हजारो नागरिक आपला शेतीमाल विकण्यासाठी येतात. सध्या कोरोनाने देशात थैमान घातले असून याची शेतकऱ्यांना लागण होऊ नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक मनोज थिटे यांच्या संकल्पनेतून बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सॅनिटायझर कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षातून येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अंगावर, कपड्यावर सॅनिटायझर फवारले जाणार असून त्यामुळे ते निर्जंतुक होऊन दुसऱ्या बाजूने बाहेर निघणार आहे. त्यामुळे कोरोना रोगाच्या प्रसाराला आळा बसेल, अशी आशा व्यक्त होत आहे. या वेळी शहरातील पत्रकारांना बाजार समितीच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटपही करण्यात आले. या वेळी मुख्य प्रशासक मनोज थिटे, सचिव सतीश काळे व प्रशासकीय मंडळातले सदस्य कर्मचारी उपस्थित होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com