जागतिक पातळीवर सतरा दिवस निसर्ग महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Seventeen day nature festival globally Organized by nisarg School Hingoli

जागतिक पातळीवर सतरा दिवस निसर्ग महोत्सव

हिंगोली : मुलांच्या निरोगी जगण्यासाठी मागील वर्षभरापासून निसर्गाची शाळा अविरतपणे सुरू आहे. ता. १५ एप्रिलपासून ते ता. एक मे पर्यत शाळेच्या माध्यमातून जागतिक निसर्ग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील सात आणि विदेशातील दहा तज्ज्ञ व्यक्तीमत्व आपले निसर्गविषयक विचार मांडणार असून स्थानिक निसर्गाविषयी माहिती देणार आहेत.

निसर्ग शाळेला एक वर्षे पूर्ण होत असल्याने सतरा दिवस जागतिक पातळीवर निसर्ग महोत्सव घेतला जाणार आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते उदघाटन होईल. पुढील सोळा दिवसात श्वेता डहाळे- राऊत (अमेरिका), राजन गवस (कोल्हापूर), प्रियंका आणि राहुल मेमाणे (जपान), पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे (अहमदनगर), पद्मभूषण राम सुतार (जागतिक मूर्तीकार, दिल्ली), श्रीकांत देशमुख (नांदेड), शंतनू घोष आणि अर्णब दास, आशिष भावसार (स्वीडन), संदीप वाटपाडे (पोलंड), सूरज वाघ (दुबई), डॉ. अंबादास रोडे (कोरिया), सुरेखा कोठावदे (आस्ट्रेलिया), केतन देसले (अमेरिका), डॉ. गार्गी भट्टाचार्य (ओमेन), आसाराम लोमटे (परभणी) हे तज्ज्ञ व्यक्ती निसर्गावर आधारीत वेगवेगळ्या विषयावर विचार मांडणार आहेत.

निसर्ग शाळेचे प्रमुख अण्णा जगताप, प्रा. ज्ञानोबा ढगे, रवी देशमुख, अॕड. राजा कदम, बालासाहेब राऊत, शिवराज जगताप, संतोष कदम, बाळू बुधवंत, विलास जाधव, प्रेमानंद शिंदे, प्रा. किरण सोनटक्के, प्रा. डाॕ. कैलास अंभोरे, पंडित अवचार, डॉ. विकास शिंदे, डाॕ. शालीकराम शिंदे, प्रा. राजकुमार टोंपे, सदा वडजे, शिवा ढोरे, सुरेश हिवाळे, अर्चना थोरात, सुचिता पाटील, भीमराव मगर, संभाजी वडजे आदीं महोत्सवासाठी प्रयत्नशील आहेत.

काय आहे निसर्ग शाळा

मुलांच्या अंगी शेती, माती, झाड, पाणी, निसर्गाच्या विषयी जाणीवा नेणीवा तयार करून निसर्गाच्या विषयी निष्ठा निर्माण करण्याचे काम शाळा करते. निसर्गाच्या शाळेत २१ वर्षाखालील मुलांना प्रवेश दिला जातो. ता. एक मे २०२१ रोजी निसर्गाच्या शाळेची सुरूवात झाली. ही शाळा सातासमुद्रापार गेली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यासह सात राज्य आणि दहा देशातील मुलांनी व पालकांनी या शाळेत सहभाग नोंदवला आहे. शाळा आठवड्यातील एक दिवस, एक तास असते. बाकीचे दिवस मुलांना कृती करण्यासाठी वेळ दिला जातो. शाळेचा एक विशिष्ट अभ्यासक्रम आहे. अनेक उपक्रम, प्रकल्प, संकल्पना या शाळेत शिकवल्या जातात.

Web Title: Seventeen Day Nature Festival Globally Organized By Nisarg School Hingoli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :HingoliMarathwadaschool