Water Shortage : अंबड तालुक्यात जाणवते भीषण पाणी टंचाई; ग्रामस्थांची भिस्त टँकरवर

जालना जिल्हयातील अंबड तालुक्यात अनेक गावात भीषण पाणी टंचाईचे सावट पसरले आहे.
water tanker
water tankersakal
Updated on

अंबड, जि. जालना - जालना जिल्हयातील अंबड तालुक्यात अनेक गावात भीषण पाणी टंचाईचे सावट पसरले आहे. यामुळे तालुक्यातील नऊ गावच्या ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर पूर्णपणे अवलंबून आहे.

तालुक्यात पावसाळयात कमी झालेले पर्जन्यमान यामुळे हिवाळ्यातच नद्या,ओढे,नाले पाण्यावाचून कोरडेठाक पडले होते. पाझर तलाव, लघु तलाव पाण्या अभावी कोरडे पडले आहे. तर काही मध्ये शून्य टक्के जलसाठा शिल्लक आहे. मार्च महिण्यात विहिरींनी तळ गाठले आहे.

यामुळे जलसाठाच शिल्लक नसल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्यासाठी सकाळी झोपेतून उठले की, पाण्याच्या शोधात दूर शेतात पायपीट करावी लागत आहे. डोक्यावर हंडे, घागर, हातात बकेट, काखेत लेकरू असा संघर्ष ग्रामस्थांना करावा लागत आहे.

अंबड तालुक्यातील नऊ गावात अकरा टँकर व विहीरीचे अधिग्रहण: जालना जिल्हयातील अंबड तालुक्यात मार्च पासुन पाणी टंचाईचें सावट पसरले आहे. तालुक्यातील नऊ गावच्या ग्रामपंचायतीने टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव दाखल केल्याने एप्रिल महिण्यात तालुक्यातील किनगाववाडी, भिवंडीबोडखा, पिंपरखेड खुर्द, बक्षाचीवाडी, धनगरपिंपळगाव, दुनगाव येथे टाका, नांदी ,शिराढोण या गावात पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे.

तसेच विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. प्रत्येक गावात एक तर दूनगाव येथे तीन टँकर सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक गावात पाण्याची टंचाई सुरू आहे. ग्रामस्थ तहानलेले असुन पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com