tushar jadhav
sakal
हिंगोली - वसमत तालुक्यातील चोंडी येथे शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी करण्यासाठी आलेल्या महसूल पथकाला मंगळवारी संतप्त शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि वृद्ध महिला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करीत मोजणी रोखली. ‘आमच्या जमिनीवर आमचे घर-संसार आणि उदरनिर्वाह अवलंबून आहे; जमीनच गेली तर आम्ही जगायचे कसे?’ असा सवाल करीत वृद्ध महिला शेतकऱ्यांनी आक्रोश केला. शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन मोजणीचे काम थांबविण्यात आले.