esakal | राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री राहूनही मुंबईत शंकरराव चव्हाणांचे घर नव्हते- अशोक चव्हाण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

राज्याचे मुख्यमंत्री राहूनही 1975 मध्ये त्यांच्याकडे मुंबईत स्वत:चे घर नव्हते. शेवटी आम्ही आमदार निवासात राहिलो, अशा आठवणीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी उजाळा दिला. 

राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री राहूनही मुंबईत शंकरराव चव्हाणांचे घर नव्हते- अशोक चव्हाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : माझे वडिल शंकरराव चव्हाण हे कडक शिस्तीचे होते. पण अतिशय प्रेमळही होते. सार्वजनिक जीवनात ते खूप पारदर्शी जीवन जगले. म्हणून दोन वेळा महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री राहूनही 1975 मध्ये त्यांच्याकडे मुंबईत स्वत:चे घर नव्हते. शेवटी आम्ही आमदार निवासात राहिलो, अशा आठवणीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी उजाळा दिला. 

येथील यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. ही मुलाखत अभिनेता रितेश देशमुख यांनी घेतली. व्यासपीठावर अमिताताई चव्हाण याही उपस्थित होत्या. श्री. चव्हाण यांनी रितेश देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.

हेही वाचा संकटाच्या महापुरातही टिकून राहता येते : कसे, ते वाचलेच पाहिजे

सार्वजनिक जीवन कडकशिस्तीचे, कणखर बाण्याचे

महाराष्ट्रासह केंद्रातही महत्वाची विविध मंत्रालय आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळलेले दिवंगत नेते डॉ. शंकरराव चव्हाण यांचे सार्वजनिक जीवन कडकशिस्तीचे, कणखर बाण्याचे आणि कठोरपणे निर्णय राबवणारे असे होते. परंतु, घरात मात्र ते प्रेमळ तर होतेच तसेच त्यांच्या ऱ्हदयात एक हळवा कोपराही होता, असे सांगून श्री. अशोक चव्हाण व अमिताताई चव्हाण यांनी शंकरराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला.

राज्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा

श्री. अशोक चव्हाण म्हणाले की, राजकारण, समाजकारणासह, सिंचन, शिक्षण, सहकार, कृषी अशा विविध क्षेत्रात शंकरराव चव्हाण यांनी मोठे योगदान दिले. म्हणून महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण राहिली आहे. जायकवाडी धरणाची उभारणी करून मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यात ते अग्रेसर होते. महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेले माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते.

 येथे क्लिक करा -  ​मनावर ताबा ठेवला तरच जीवनात सुख: भदंत धम्मसेवक ​


जलसंस्कृतीचे जनक 

श्री. चव्हाण म्हणाले की, जलसंस्कृतीचे जनक माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांनी राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंस्कृती आणली. राज्यातील अनेक सिंचन प्रकल्प त्यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लावले. दुष्काळमुक्तीसाठी त्यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत मांडला आहे.