देशातील धर्मांतराच्या घटनांवर पवारांचं सडेतोड भाष्य; सौहार्द बैठकीत मांडले विचार : Sharad Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

Sharad Pawar: देशातील धर्मांतराच्या घटनांवर पवारांचं सडेतोड भाष्य; सौहार्द बैठकीत मांडले विचार

संभाजीनगर : भारतातील प्रत्येक नागरिकाला आपल्या आवडीचा धर्म निवडण्याचं स्वातंत्र्य राज्यघटनेनं दिलं आहे. पण सध्या देशात वेगळचं वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर धर्मांतराच्या घटनांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी सडेतोड भाष्य केलं आहे.

देशातील सद्य परिस्थितीत सामाजिक व धार्मिक सौहार्द निर्माण करण्यासाठी संभाजीनगर इथं आयोजित सौहार्द बैठकीत ते बोलत होते. (Sharad Pawar comments on religious conversion incidents in India at SambhajiNagar Meeting)

पवार म्हणाले, "देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाविषयी चिंता वाटावी असं चित्र आहे. देशातील अनेक राज्यात ख्रिश्चन समाजाच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले होत आहेत. ख्रिश्चन समाज हा अत्यंत शांत प्रवृत्तीचा असा आहे. तरी कुठेतरी एखाद्या व्यक्तीनं आपला व्यक्तीगत धर्म बदलण्याचा निर्णय घेतला तर संपूर्ण समाजावर आणि प्रार्थनास्थळांवर हल्ले होतात" (Latest Marathi News)

मुस्लिम समाजात दारिद्र्य, मागासलेपणा, कमतरता निश्चित आहे. समाज एकसंध करायचा असेल, विकासाच्या रस्त्यावर न्यायचा असेल तर एखादा घटक मागे ठेवून समाज कधी पुढे जाऊ शकणार नाही. मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा सामान्य लोकांचा दृष्टीकोन जरी अनुकूल असला तरी काही लोक यात जाणीवपूर्वक कटुता कशी येईल याची काळजी घेतात, हे मोठं आव्हान देशात दिसतं.

त्यामुळे आपली जबाबदारी आहे की देशातील प्रत्येक घटक हा भारतीय आहे, या भारतीयांच्या हितासाठी आपण भिन्नता, कुटता, विद्वेष यापासून दूर राहिले पाहिजे, असा सल्ला यावेळी पवारांनी दिला. (Marathi Tajya Batmya)

उद्या प्रसंग आला तरी एकजुटीनं असा विद्वेष वाढवणाऱ्या प्रवृत्तींविरोधात उभं राहण्याची भूमिका घेतली पाहिजे. सत्तेवर कोणीही आले तरी देश आणि समाज एकसंध ठेवण्यास जे उपयुक्त असेल, त्याच्या पाठिशी उभे राहणं, हे सूत्र घेऊन पुढे जायची गरज आहे, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.