शरद पवारांकडून राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर; ही आहेत नावे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

शरद पवार हे आज बीडमध्ये असून, त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाच उमेदवार जाहीर केले. बीडमध्ये काका-पुतण्याची लढाई पहायला मिळणार हे निश्चित झाले आहे. म्हणजे जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर अशी लढाई होईल. तर, महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या परळी मतदारसंघातून पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात लढत पाहायला मिळाली. 

बीड : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरवात केली असून, आज (बुधवार) बीड दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी पाच उमेदवारांची घोषणा केली. 

शरद पवार हे आज बीडमध्ये असून, त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाच उमेदवार जाहीर केले. बीडमध्ये काका-पुतण्याची लढाई पहायला मिळणार हे निश्चित झाले आहे. म्हणजे जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर अशी लढाई होईल. तर, महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या परळी मतदारसंघातून पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात लढत पाहायला मिळाली. 

पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडताना धनंजय मुंडेंच्या होमपिचवर  राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर केली. परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर गेवराई-  विजयसिंह पंडित, केज- नमिता मुंदडा, बीड-  संदीप क्षीरसागर, माजलगाव- प्रकाश सोळंके असे पहिले पाच उमेदवार शरद पवारांनी जाहीर केले. एकमेव आष्टी या मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करु असे शरद पवारांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar declares NCP candidate list in Beed