- धनंजय शेटे
भूम - श्री शिवाजी खरेदी विक्री संघावर बिनविरोध काढत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुन्हा एकदा वर्चस्व. या निवडणुकीसाठी एकूण ६२ अर्ज दाखल झाले होते. आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी एकूण ४७ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले.
मागील चार वर्षापासून शिवाजी खरेदी विक्री संघाची निवडणूक झालेली नव्हती त्यामुळे अर्ज भरण्याच्या वेळेस भरपूर प्रमाणात अर्ज आल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल असे वाटत असताना
चुरशीची न होता आज अर्ज काढून घेण्याच्या दिवशी सर्व विरोधकांनी अर्ज काढून घेतल्याने शिवाजी खरेदी-विक्री संघाच्या १५ जागेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.