खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शरद पवार म्हणाले, पक्षाबद्दल विश्वास वाटत असेल तर काय करायचे!

ई सकाळ टीम
Monday, 19 October 2020

सध्या राज्यात भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. चर्चेला खूद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूर्ण विराम दिला आहे.

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : सध्या राज्यात भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. चर्चेला खूद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूर्ण विराम दिला आहे. ते म्हणाले, की, एकनाथ खडसे विरोधीपक्ष नेते होते. राज्याचे अर्थमंत्री होते. एक नेता म्हणून खडसे यांचे मोठे योगदान आहे. ते आम्ही पाहिले आहे आणि त्यामुळे त्याचं कर्तृत्व, जबाबदारी आम्ही पाहिले आहे. त्यामुळे राजकीय निर्णय काय घ्यायचा आहे, त्यांचा तो निकाल आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी रविवारी (ता.१८) केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोमवारी (ता.१९) तुळजापुरात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज : शरद पवार

श्री.पवार म्हणाले, की खडसे साहेब विरोधी पक्ष नेते होते. अर्थमंत्री होते. एका पक्षाच्या उभारणीसाठी त्यांचे फार मोठे योगदान होते. त्यांची क्षमता, कर्तृत्व विशेषतः खान्देशातील लोकांमध्ये आहे. त्यांनी केलेल्या कष्टाची नोंद कदाचित घेतली जात नाही. त्यामुळे त्यांना जिथे नोंद घेतली जाते तिथे जावे का असे वाटत असेल. गेली २५ वर्ष पाहिली तर सर्वात प्रभावी विरोधीपक्ष नेते म्हणून खडसेंची ओळख आहे. पण, दुर्दैवाने त्याची दखल घेतली गेली नाही. त्यांना त्याबद्दल दु:ख वाटत असेल. त्यामुळे आपल्या कामाची जिथे नोंद घेतली तिथे जावे वाटते का, असा विचार करत असतील. पण, त्यांना आमच्या पक्षाबद्दल विश्वास वाटत असेल तर काय करायचे' ' असं सूचक विधानही पवारांनी केले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar Speak On Eknath Khadse's Nationalist Congress Party Joining