Beed News : वारे वाऽऽ सरकार! पाच महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या लेखापालाची केली वडवणीला बदली; कागदावर अधिकारी अद्याप सेवेत कार्यरत

'आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय' ही म्हण प्रशासनकर्त्यांनी उलटी करून 'कुत्रं दळतंय अन् आंधळं पीठ खातंय' अशी करून दाखवल्याची चर्चा.
Ganesh Pagare

Ganesh Pagare

sakal

Updated on: 

बीड - महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालनालयाचा एक अत्यंत भयंकर व हास्यास्पद गलथान कारभार समोर आला आहे. बीड पालिकेतून लेखापाल पदावरून तब्बल पाच महिन्यांपूर्वी (३१ मे २०२६ रोजी) नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले गणेश पगारे यांना शासनाने थेट ३० ऑक्टोबर २०२६ रोजी काढलेल्या आदेशात वडवणी नगर पंचायत येथे रिक्त पदी बदलीने पदस्थापना दिल्याचा अजब कारभार केला आहे.

Loading content, please wait...