Chhatrapati Sambhajinagar Accident: शेंद्रा एमआयडीसीत भीषण अपघात! ट्रकने दुचाकी दीडशे फूट फरफटत नेली; २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Shendra MIDC Accident Truck Drags Bike 150 Feet One Dead: चौकातील बंद सिग्नल यंत्रणेमुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिग्नल तातडीने सुरू करून वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
Chhatrapati Sambhajinagar Jalna Highway Accident Truck Drags Two Wheeler for 150 Feet One Dead and One Injured in Shendra MIDC

Chhatrapati Sambhajinagar Jalna Highway Accident Truck Drags Two Wheeler for 150 Feet One Dead and One Injured in Shendra MIDC

sakal

Updated on: 

-बाळासाहेब काळे

करमाड : छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरील शेंद्रा एमआयडीसी परिसरातील कुंभेफळ पोलीस चौकीसमोर रविवारी (ता. ११) रात्री दीडच्या सुमारास दुचाकी आणि ट्रकची भीषण धडक झाली. या अपघातात ओमकार नारायण निकम (वय २०, रा. दाभाडी, ता. बदनापूर, जि. जालना) याचा मृत्यू झाला, तर पवन शंकरराव बकाल (वय २५, रा. दाभाडी) हा जखमी झाला. धडकेनंतर ट्रकने दुचाकी सुमारे दीडशे फूट फरफटत नेली. या घटनेमुळे शेंद्रा एमआयडीसी परिसरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com