Farmers Still Await Excess Rain Compensation
sakal
शेंदुरवादा : सप्टेंबरमधील अतिवृष्टीने खरिपाच्या पिकाची वाताहत झाल्यानंतर तातडीने पॅकेज जाहीर करून दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळेल अशी घोषणा शासनाने केली खरी पण दिवाळी होऊन दोन महिने उलटले तरी शेंदुरवादा महसूली मंडळातील शेतकरी अजून अनुदानापासून वंचितच असल्याने शासनाच्या घोषणेनंतरही मदत मिळण्यास विलंब झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.