Udgir News : शिरोळ जानापूर चेक पोस्टवर 45 हजाराची दारू पकडली; दोन आरोपी फरार

नाकाबंदी पथकाने कर्नाटकातून मोटरसायकलवर बेकायदेशीर रित्या पंचेचाळीस हजार रुपयांची विदेशी दारू चोरट्या मार्गाने विक्री करण्याच्या उद्देशाने आणत असताना पकडली.
Liquor Seized
Liquor Seizedsakal

उदगीर (जि. लातुर) - सध्या लातूर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणाच्या सीमा भागातील शिरोळ जानापुर (ता. उदगीर) येथील चेकपोस्टवर कर्तव्यावर असलेल्या नाकाबंदी पथकाने कर्नाटकातून मोटरसायकलवर बेकायदेशीर रित्या पंचेचाळीस हजार रुपयांची विदेशी दारू चोरट्या मार्गाने विक्री करण्याच्या उद्देशाने आणत असताना पकडली आहे. यातील दोन आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.

याबाबत सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सरळ जाणापूर येथील चेक पोष्टवर सकाळी सव्वा आठच्या सुमारास चेक पोस्टवर नाकाबंदी सुरू करून वाहनांची तपासणी करत असताना होकार्णा मार्गे उदगीरकडे येत असलेली एक मोटरसायकल क्र.के ऐ ३८ क्यु ५००३ दिसली. त्या मोटरसायकलला अडवून दोघांच्या मध्ये असलेल्या पिवळ्या रंगाच्या पोत्यात काय आहे? असे विचारले असता त्यांनी विदेशी दारू आहे असे सांगितले. त्यावरून ते पोते ताब्यात घेऊन त्याची वाहतूक व विक्रीचा परवाना आहे का? याची पडताळणी केली असता परवाना आढळून आलेला नाही.

या पिवळ्या रंगाच्या पोत्यात ओरिजिनल चॉईस नाव असलेल्या ९ खोक्यात ९० एम एलच्या एकुण खपटी ८६४ बाटल्या ज्याची एकुण किंमत ३५४६०, दोन खपटी बॉक्स मध्ये १८० एम एलच्या ७२ बाटल्या त्यांची एकूण किंमत नऊ हजार असे एकुण पंचेचाळीस हजार रुपयाची विदेशी दारू व मोटार सायकल पॅशन प्रो याची अंदाजे किंमत ४० हजार असे एकूण ८३ हजार पाचशे साठ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चेक पोस्टवर नेमकी वर असलेले पोलीस सागर पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी विनायक व्यंकट वरदाळे (वय-३५), राम भिमण्णा वडीयार (वय-४०) दोघेही रा. बाऱ्हाळी यांच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

तहसीलदार राम बोरगावकर व आचारसंहिता पथक प्रमुख तथा गटविकास अधिकारी प्रवीण सूरडकर यांचा मार्गदर्शना या कार्यासाठी पथक प्रमुख राजेश मुळवे, पद्माकर फुले, लिंबराज मुळे, फोटोग्राफर प्रतिक तेलंग यांचा समावेश होता.याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याला कळल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी एस एन शिंदे व नामदेव चेवले घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

बाथरूमचे निमित्त करून आरोपी पळाले

शिरोळ जानापुर या चेक पोस्टवर दारूची अवैधरित्या वाहतूक व चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असलेल्या दारूवर कारवाई होणार हे लक्षात येतात संबंधित आरोपींनी आम्ही बाथरूमला जाऊन येतोत अशी बतावणी करून पोलिसांना चकवा देऊन फरार होण्यात यशस्वी झाले. संबंधित पोलीस व निवडणूक आयोगाने नेमलेले पथक यांच्या हातून संबंधित आरोपी पळाल्याने यांच्यावर काय कारवाई होते हे आता पाहणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com