

Shirur Nagar Panchayat Election Faces Voter List Row as 287 Applicants Allegedly From Outside the City Raise Questions
esakal
बीड: शिरूर शहरातील आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर मतदारयादीतील कथित बोगस मतदारांचा महाघोटाळा समोर आला आहे. अवघ्या सोळा दिवसांत तब्बल ६२५ नवीन मतदार नोंदणी अर्ज दाखल झाले असून, त्यातील २८७ अर्जदार थेट शिरूर शहराबाहेरील रहिवासी असल्याचा स्फोटक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी केला आहे. बोगस आधारकार्ड, रेशनकार्ड आणि पीटीआरच्या जोरावर बाहेरगावच्या व्यक्तींची नावे मतदारयादीत घुसवण्याचा हा कुटिल डाव असल्याचा संशय त्यांनी व्यक्त करत प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले.