Success story : संसार सांभाळून अभ्यास करत स्पर्धा परीक्षेत बाजी; माजलगाव येथील शीतल उगले महसूल सहायकपदी नियुक्त
MPSC Success : शीतल उगले-पोकळे हिने लग्नानंतर संसार सांभाळत एमपीएससी परीक्षेत अपयशांचा सामना केला आणि सातत्याने अभ्यास करत महसूल सहायकपदी निवड होऊन कुटुंबाचा आनंद द्विगुणीत केला. चिंचगव्हानच्या सुनेने नवा आदर्श निर्माण केला आहे.
माजलगाव : लग्नानंतर संसाराचा भार अंगावर पडल्यावर शिक्षण होत नाही, हा समज खोटा ठरवत चिंचगव्हानच्या सुनेने स्वयं अध्ययनात सातत्य राखत एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.