शिवसेनेकडून आरोग्यसेवक, पोलिस, गरजूंना भोजन वाटप 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 March 2020

बीड येथील शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी शहरात आरोग्यसेवक, पोलिस व गरिबांना अन्नपाकिटांचे वितरण केले. १४ एप्रिलपर्यंत भोजन वाटप केले जाणार आहे.

बीड -  कोरोनाशी लढ्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाऊनमध्ये गरजवंतांना अडचणीत मदत म्हणून रविवारी (ता.२९) शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी शहरात आरोग्यसेवक, पोलिस व गरिबांना अन्नपाकिटांचे वितरण केले. १४ एप्रिलपर्यंत भोजन वाटप केले जाणार आहे.

 २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे सर्वच जनजीवन विस्कळित झाले आहे. हातावर पोट असणाऱ्यांना तर अडचणी आल्याच आहेत. शिवाय सामान्यांचे सेवक असलेले आरोग्य कर्मचारी व पोलिसांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा - इस्लापूर येथून परतलेले मजूर विलगीकरण कक्षात

प्रकल्पाचा प्रारंभ जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, पोलिस उपअधीक्षक भास्कर सावंत, शेषेराव खांडे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात झाला. हा प्रकल्प १४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी राजू वंजारे, सुधाकर पवार, शालिनी परदेशी यांच्यासह शिवसैनिक सुदर्शन मोरे, राहुल घोडके, पप्पू शिंदे, अनुरुद्र साळवी, विकास घोडके, गोरख खांडे आदी उपस्थित होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena distributes food to health workers, police, the needy