शिवसेनेचे दत्ता पा. कोकाटेंकडून १०० क्विंटल तांदूळ वाटप

फोटो
फोटो

नांदेड : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संबंध देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गोरगरिंबाचा रोजगार बुडत आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी पुढाकार घेऊन शंभर क्विंटल तांदूळ (प्रत्येक कुटुंबाला पाच किलो) वाटप सुरु केले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते उपक्रम सुरु केला आहे. 

कोरोना या महाभयंकर आजाराने संपूर्ण जगभरात हाहाकार माजविला आहे. त्याचा फटाका आपल्याही देशाला बसला असून महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहर सध्या या आजाराने त्रस्त आहे. देशात सर्वाधीक रुग्ण हे माहाराष्ट्रात आढळत असून त्यात मृतांची संख्याही मोठी आहे. ही हानी टाळण्यासाठी राज्‍यभर लॉकडाऊन व संचारबंदी लावण्यात आली आहे. या लॉकडाऊनचा सर्वाधीक फटका सर्वसामान्य गोरगरीब व हातावर पोट असणाऱ्यांना बसला आहे. त्यांचा रोजगार बुडत असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संकटातून त्यांना सावरण्यासाठी व त्यांच्या पोटाची आग विझविण्यासाठी अनेक सामाजीक संस्था पुढे येत आहेत. त्यांना मदतीचा हात देत देऊन धीर धरा मात्र घरातून बाहेर पडू नका असा सल्ला देत आहेत.

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन सांगवी परिसरात

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन सांगवी परिसरात सर्वाधीक रोजगारांची वस्ती म्हणून पाहिल्या जाते. या परिसरातील रामनगर, गौत्तमनगर, अंबानगर, माधवनगर, त्रीशनरणनगर, कुक्कुटपालन, सिद्धार्थनगर यासह आदी नगरातील नागरिक रोजंदारीचे काम करतात. अनेकांकडे ॲटो, हातगाडे तर काही जण बांधकाम मिस्त्री आहेत. मात्र लॉकडाऊनमध्ये या सर्वच लोकांचा रोजगार बंद झाला आहे. पोटावर हात असणाऱ्या या परिवारांच्य चुली पेटणे बंद झाले. ही जाणीव ओळखून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी स्वखर्चातून १०० क्विंटल तांदूळ या भागातील नागरिकांना वाटप सुरू केले आहे. 

मदतीचा हात पुढे करत चक्क ते स्वत: तांदूळ वाटप 

सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत एक मिटर अंतरावरून या भागातील प्रत्येक घरी जावून प्रत्येक कुटुंबाला पाच किलो तांदूळ देण्यात आहे. विशेष म्हणजे या भागात दत्ता पाटील कोकाटे हे नेहमीच मोफत पाणीपुरवठा करत असतात. त्यांनी कोरोनासारख्या या महामारीचा फटका आपल्या परिसरातील नागरिकांना बुस नये म्हणून मदतीचा हात पुढे करत चक्क ते स्वत: तांदूळ वाटप करत आहेत. यासाठी त्यांचे सर्व सहकारी त्यांना या महत्वाच्या कामात साथ देत आहेत. 

तांदूळ वाटपसाठी हे घेत आहेत परिश्रम 

रमेश पाटील कोकाटे, अंकुश पाटील कोकाटे, सखाराम तुप्पेकर, दर्शनसिंग सिध्दू, दिगांबर पाटील कोकाटे, शाम वानखेडे, बाळू कोकाटे, गजानन कोकाटे, कचरु कोकाटे, अंकुश बोराटे, गंगाधर थोरात, अमोल राठोड, मारोती जाधव, विठ्ठल राजेगोरे, परसराम राठोड यांच्यासह आदींचा सहभाग होता. 
  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com