Latur : शिवसेनेचे लातूरचे माजी जिल्हाप्रमुखांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Subhash Kate
Latur : शिवसेनेचे लातूरचे माजी जिल्हाप्रमुखांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Latur : शिवसेनेचे लातूरचे माजी जिल्हाप्रमुखांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

चाकूर (जि.लातूर) : शिवसेनेत मागील ३५ वर्षांपासून कार्यरत असलेले लातूरचे माजी जिल्हाप्रमुख सुभाष काटे यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यावर आरोप करित पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेत (Shiv Sena) काटे यांनी शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख यासह ९ वर्षे लातूर (Latur) जिल्हाप्रमुख म्हणून काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती सदस्य, सरपंच, नगरपंचायतीमध्ये दोन नगरसेवक विजयी झाले आहेत. पक्षात त्यांनी विविध (Chakur) आंदोलने केली आहेत. (Shiv Sena's Former Latur District President Subhash Kate Resigned From Party)

नगरपंचायत निवडणुकीत त्यांच्या पत्नी लक्ष्मी काटे या नगरसेवक होत्या. त्याच प्रभागातून त्यांनी यावेळी मुलासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. परंतू महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, माजी जिल्हाप्रमुख यांना विश्वासात न घेता फक्त दोन जागा शिवसेनेला दिल्या. यामुळे काटे यांचा मुलगा मल्हारी काटे यांनी त्याच प्रभागातून अपक्ष निवडणुक लढवली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे चाकूर येथे आले असता त्यांनी काटे यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले.

खैरे यांच्यामुळे मराठवाड्यात पक्षाची वाताहत झाली असून ते विरोधी पक्षाच्या नेत्यांना सहकार्य करीत आहेत व ते शिवसैनिकांना संपविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे आपण पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे काटे यांनी सांगितले. आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून अपक्ष म्हणून मतदारसंघात काम करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Shiv Sena