esakal | शिवसेनेच्या दोन गटांत हाणामारी, आजी-माजी आमदारांमधील मतभेद उघड
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना

शिवसेनेच्या दोन गटांत हाणामारी, आजी-माजी आमदारांमधील मतभेद उघड

sakal_logo
By
आनंद खर्डेकर

परंडा (जि.उस्मानाबाद) : शिवसंपर्क अभियानाच्या (Shiv Sampark Abhiyaan) बॅनरवर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे छायाचित्र नसल्याने शिवसेनेच्या दोन गटात हाणामारी झाल्याचा प्रकार मंगळवारी (ता.२० ) घडले. शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीने राज्यभर शिवसंपर्क अभियान सुरू आहे. जनतेशी संवाद, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. या निमित्ताने तालुक्यातील (Paranda) मोठ्या गावात कार्यकम सुरू आहेत. कार्यक्रमाच्या स्थळी लावण्यात येणाऱ्या बॅनरवर माजी आमदार पाटील यांचे छायाचित्र नसल्याने त्यांचा गट नाराज असल्याची चर्चा सुरू होती. मंगळवारी याच कारणावरुन शिवसेनेचे तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव यांना काही जणांनी मारहाण केले.(shiv sena's two groups beaten eachother in osmanabad district glp88)

हेही वाचा: Ashadi : आजी-आजोबांच्या स्मरणार्थ उभारले विठ्ठल-रुख्माई मंदिर

यात जाधव जखमी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे एकेकाळी जाधव माजी आमदार पाटील यांचे समर्थक होते. मागील अनेक वर्षांपासून (Osmanabad) आमदार सावंत व पाटील या दोन गटांत कायम मतभेद होते. अनेक वेळा ते टोकाला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत गटबाजी दूर झाल्याचे बोलले जात असताना आजच्या प्रकारामुळे पुन्हा गटबाजी उघड झाली आहे.

loading image