

Farmer Son Shivprasad Parve Reaches DySP Rank From PSI and Naib Tehsildar Through Hard Work and Determination
sakal
सातारा : परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली, तरी मनात ध्येय निश्चित असेल आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची तयारी असेल, तर यशाचा मार्ग नक्की सापडतो. जालना जिल्ह्यातील बदापूर गावचे सुपुत्र शिवप्रसाद नानासाहेब पारवे यांनी आपल्या प्रवासातून हेच सिद्ध केले आहे. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातून आलेल्या या तरुणाने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एकापाठोपाठ एक यश संपादन करत आता पोलीस उपअधीक्षक (DySP) पदापर्यंत मजल मारली आहे. त्यांचा हा प्रवास ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणेचा नवा अध्याय ठरत आहे.