Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षेने मानाच्या गदेवर कोरलं नाव |shivraj rakshe wins maharashtra kesari title govt trebles honorarium for wrestlers | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivraj rakshe wins maharashtra kesari title govt trebles honorarium for wrestlers

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षेने मानाच्या गदेवर कोरलं नाव

धाराशिव : धाराशिव येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजयी होत नांदेडच्या शिवराज राक्षे यांने मानाच्या गदेवर आपलं नाव कोरल आहे. तर नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याला पराभवाच तोंड पहाव लागले आहे. या सामन्यादरम्यान दिड मिनिटाचा खेळ शिल्लक असताना सदगीरला दुखापत झाली होती तरीही त्याने लढण्याची उमेद सोडली नाही हे या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

संध्याकाळी मातीवरील व मॅटवरील कुस्त्याची सेमीफायनल झाली. यामध्ये मॅटवर शिवराज राक्षे व पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली. यात शिवराजने बाजी मारत अंतिम सामन्यात धडक मारली. तर माती गटामध्ये हर्षवर्धन सदगीर विरुध्द गणेश जगताप असा सामना झाला त्यात सदगीर विजयी ठरला. हर्षवर्धन व शिवराज यांची मॅटवर लढत झाली, पहिल्यापासुन दोघांनी आक्रमक खेळ केला पण मॅटची सवय असलेल्या व उंचीचा फायदा घेत शिवराजने गुणांची कमाई केली.

तरीही हर्षवर्धन देखील तितक्याच ताकदीने लढत होता. शेवटी सामन्याला दिड मिनिट शिल्लक असताना हर्षवर्धन याच्या हाताला दुखापत झाली. तेव्हाच शिवराज चार व हर्षवर्धन शुन्य असा स्कोर होता. काही काळ थांबुन त्याने पुन्हा मैदानात अवतरला. वेळ कमी व दुखापतीला झुंज देत तो शिवराजला भिडत होता. पण शिवराजनेही युक्तीचा वापर करत वेळ घालवत विजयावर शिक्कामोर्तब केले.महाराष्ट्र केसरी होण्याचा मान शिवराज याने मिळवला मानाच्या गदेवर आपलं नाव कोरलं.