Mahavitaran Scam
sakal
बीड - महावितरणच्या कंत्राटे व देखभाल-दुरुस्ती कामांतील तब्बल १३ कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या महाघोटाळ्याप्रकरणी आता तपासाचा वेग कमालीचा वाढला आहे. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी ६ बड्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुख्य अभियंता (छत्रपती संभाजीनगर) श्री. कुमठेकर यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय चौकशी समिती बीडमध्ये दाखल झाली आहे. गुरुवारी (२६ नोव्हेंबर) सकाळपासून तब्बल १० तासांहून अधिक काळ समितीकडून कसून चौकशी सुरू असल्याने महावितरणच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.