अंबाजोगाई - तालुक्यातील एका गावात मंगळवारी (ता.३१) एका अडीच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेचा बर्दापूर पोलिस ठाण्यात १३ वर्षीय शाळकरी मुलावर गुन्हा दाखल झाला आहे..आठवड्याभरापूर्वीच डोंगर पिंपळा येथे एका १५ वर्षीय मुलाने आपल्याच नात्यातील चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच, ही दुसरी घटना समोर आली आहे..मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पीडित चिमुरडी आपल्या घरामागील मोकळ्या मैदानात गेली होती. यावेळी गावातीलच आरोपी अल्पवयीन मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेत चिमुरडीला गंभीर दुखापत झाली असून, पीडितेच्या आईने बुधवारी (ता.१) बर्दापूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली..या तक्रारीवरून बर्दापूर पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. कांबळे या प्रकरणाचा तपास करत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.